Monday, October 24, 2011

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...♥ :)


पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...♥ :)

कोण ग तो तुझा म्हटल्यावर
झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....♥ :)

... रोज निरोप घेताना
पुन्हा कधी भेटशील म्हणताना
पाणावलेले डोळे आणि
कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....♥ :)

कारण नसताना तासभर फोनवर भांडायचा
स्वतः राग करून फोनही ठेवायचं
फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला
आय लव यु चा म्यासेग बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....♥ :)

नकळत स्पर्श झाल्यावर
तिच्या हृदयाचा चुकणार ठोका
आणि थरथरणारे ओठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटत....♥ :)


0 Comments:

Post a Comment