Sunday, October 24, 2010

तिचा स्वभाव..

तिचा स्वभाव...

रोजचंच येणं, नि रोजचंच ज़ाणं
नेहमीचेच sms , नेहमीचच गाणं
माझ्या मनातील गुपीत तिला कसं कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

प्रपोज करताना ‘can you marry me?’ म्हटलं
उत्तरात ती म्हणाली ‘can’ नाही ‘ will you marry me?’ म्हणायचं
प्रश्नामधलं गांभीर्य तिला कसं कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

आई-वडिलांची आज्ञाधारक म्हणून नाही म्हटली
पण वागते तर अशी जणू खरच मला पटली
माझ्या भावनांचा होणारा गुंता तिला कसं कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

‘माझा स्वभाव मलाच कळत नाही तर तुला कसा कळणार?’ असं म्हणायचं
आणि स्वतःला चारचौघात नेहमीच लपवत राहायचं
मला सगळं कळतंय, हे तिला कसा कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

एक तरी मैत्रीण असावी...

एक तरी मैत्रीण असावी
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

;;